मधुमेह हा आजार भारतात झपाट्याने वाढत चालला आहे. बर्याच जणांना वाटते की हा फक्त रक्तातील साखरेचा आजार आहे, पण प्रत्यक्षात दीर्घकाळ नियंत्रणात न ठेवल्यास तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करतो. यालाच आपण मधुमेहाच्या गुंतागुंत असे म्हणतो. योग्य काळजी न घेतल्यास हा आजार हृदय, डोळे, मूत्रपिंड, नसांपासून ते पाय आणि त्वचेमध्येही धोकादायक स्थिती निर्माण करतो.
मधुमेहाच्या गुंतागुंती टाळण्यासाठी योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. Manipal Hospital Pune (मणिपाल हॉस्पिटल पुणे) येथे अनुभवी डायबेटॉलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट, नेत्रतज्ज्ञ व हृदयरोग तज्ञांची टीम रुग्णांना संपूर्ण तपासणी व वैयक्तिकृत उपचार योजना उपलब्ध करून देते. अत्याधुनिक तपासण्या, आहार मार्गदर्शन, पायांची काळजी (Diabetic Foot Care) तसेच नियमित फॉलो-अप यामुळे रुग्णांना मधुमेहाच्या गुंतागुंतींपासून वाचण्यास मदत होते.
चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाच्या प्रमुख ६ गुंतागुंती, त्यांची लक्षणे आणि त्यापासून बचावाचे मार्ग.

मधुमेहाच्या गुंतागुंत: जाणून घ्या ६ गंभीर परिणाम व त्यावरील उपाय
१. हृदयविकार व स्ट्रोक
मधुमेहाच्या गुंतागुंतींमध्ये सर्वाधिक सामान्य म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या.
-
दीर्घकाळ रक्तातील साखर जास्त रहिल्याने रक्तवाहिन्यांवर ताण येतो.
-
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबही वाढतो.
-
परिणामी हृदयविकाराचा झटका (Heart Attack), अचानक छातीत वेदना, हृदयविकारामुळे श्वास घेण्यास त्रास, तसेच स्ट्रोक (मेंदूतील रक्तपुरवठा थांबणे) याचा धोका वाढतो.
बचावासाठी:
संतुलित आहार, वजन नियंत्रण, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे आवश्यक आहे.
२. मूत्रपिंडाचे आजार (Diabetic Nephropathy)
मधुमेहाच्या गुंतागुंतांमध्ये मूत्रपिंडाचा आजार अतिशय गंभीर मानला जातो.
-
रक्तातील साखर सतत जास्त राहिल्याने मूत्रपिंडातील सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात.
-
मूत्रपिंड हळूहळू योग्य प्रकारे कार्य करणे थांबवतात.
-
त्यामुळे प्रथिन मूत्रातून जाणे (proteinuria), सुजणे, थकवा अशी लक्षणे दिसतात.
-
दीर्घकाळात ही अवस्था किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचू शकते ज्यासाठी डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण आवश्यक होऊ शकते.
बचावासाठी:
दरवर्षी मूत्रपिंडाची तपासणी, मीठ व तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.
३. डोळ्यांचे विकार (Diabetic Retinopathy)
मधुमेहाच्या गुंतागुंतींपैकी डोळ्यांशी संबंधित समस्या दुर्लक्षित करू नयेत.
-
रेटिनामधील (डोळ्याच्या मागच्या पडद्यावरील) रक्तवाहिन्या खराब होतात.
-
दृष्टी धूसर दिसणे, डोळ्यांसमोर ठिपके दिसणे, अचानक दृष्टी कमी होणे यासारखी लक्षणे दिसतात.
-
मधुमेहींना मोतीबिंदू आणि ग्लॉकोमा होण्याची शक्यता सामान्यांपेक्षा जास्त असते.
-
उपचार न घेतल्यास ही समस्या अंधत्वापर्यंत जाऊ शकते.
बचावासाठी:
रवर्षी डोळ्यांची तपासणी करून घेणे, साखर नियंत्रणात ठेवणे आणि धूम्रपान टाळणे.
४. नसांचे नुकसान (Diabetic Neuropathy)
मधुमेहाच्या गुंतागुंतींमध्ये नसांचे नुकसान हा सर्वाधिक त्रासदायक परिणाम आहे.
-
जास्त साखरेमुळे नसांवर परिणाम होतो.
-
हात-पायांत सुन्नपणा, मुंग्या येणे, जळजळ होणे, चुरचुरणे यासारखी लक्षणे दिसतात.
-
पुरुषांमध्ये लैंगिक कमजोरी (erectile dysfunction) देखील होऊ शकते.
-
गंभीर अवस्थेत पायात जखमा होऊन त्या न भरल्याने गॅंग्रीन होऊ शकते आणि अंगच्छेद (amputation) करावा लागू शकतो.
बचावासाठी:
साखर नियंत्रणात ठेवणे, पायांची स्वच्छता राखणे आणि नियमित तपासणी करणे.
५. पायांचे विकार (Diabetic Foot)
मधुमेहाच्या गुंतागुंतींपैकी “डायबेटिक फूट” ही समस्या अतिशय धोकादायक आहे.
-
पायावर झालेल्या लहानशा जखमा सुद्धा सहज बऱ्या होत नाहीत.
-
संसर्ग होऊन फुट अल्सर तयार होतात.
-
जखमा हाडांपर्यंत पसरल्यास ऑपरेशन करावे लागू शकते.
-
योग्य काळजी न घेतल्यास पाय कापावा लागण्याची वेळ येऊ शकते.
बचावासाठी:
दररोज पाय तपासणे, आरामदायक बूट/चप्पल वापरणे, पाय स्वच्छ व कोरडे ठेवणे आवश्यक आहे.
६. त्वचेचे व दातांचे आजार
मधुमेहाच्या गुंतागुंतींमध्ये त्वचा आणि तोंडाशी संबंधित समस्या सुद्धा महत्वाच्या आहेत.
-
जास्त साखरेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
-
परिणामी त्वचेवर वारंवार बुरशीजन्य व जीवाणूजन्य संसर्ग होतो.
-
जखमा लवकर भरत नाहीत.
-
दातांच्या मुळाशी संसर्ग (gum disease) होऊन दात सैल पडतात किंवा गळतात.
बचावासाठी:
दैनिक स्वच्छता, संतुलित आहार, त्वचा कोरडी ठेवणे आणि नियमित दंत तपासणी आवश्यक आहे.
मधुमेहाच्या गुंतागुंत टाळण्यासाठी टिप्स
-
नियमित तपासणी: रक्तातील साखर, किडनी, डोळे व हृदय तपासणी दरवर्षी करा.
-
आहार व व्यायाम: कमी तेलकट, कमी साखरयुक्त आहार व दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम.
-
औषधे वेळेवर: डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा नियमित वापर.
-
तणाव टाळा: योग, ध्यान, चालणे यांसारख्या उपायांनी तणाव कमी करा.
-
धूम्रपान व मद्यपान टाळा.
मधुमेहाच्या गुंतागुंत या फक्त साखर वाढल्यामुळे नाही, तर दीर्घकाळ साखरेचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे होतात. त्यामुळे प्रत्येक मधुमेहींनी आपले आरोग्य नियमित तपासणे, आहार व जीवनशैलीत शिस्त पाळणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. वेळेवर काळजी घेतल्यास या गुंतागुंतींपासून बचाव करणे शक्य आहे.
FAQ's
साधारणतः मधुमेह अनेक वर्षे नियंत्रणात न ठेवल्यास या गुंतागुंती दिसू लागतात, पण काही रुग्णांमध्ये ५–१० वर्षांतच लक्षणे दिसू शकतात.
डोळ्यांची तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट, पायांची तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी व हृदय तपासणी करणे आवश्यक आहे.
दररोज पाय तपासणे, लहान जखमा झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवणे आणि पाय स्वच्छ ठेवणे.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आणि वर्षातून एकदा नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करणे.
जीवनशैलीत बदल, औषधांचे नियमित सेवन, आणि साखरेवर सतत नियंत्रण ठेवणे हेच सर्वात महत्वाचे आहे.